
कोल्हापूर : प्रत्येक महिलेचे आयुष्य म्हणजे कडूगोड आठवणींचं गाठोडे असते. पण, सर्वच महिला आत्मचरित्र लिहित नाहीत-लिहू शकत नाहीत; मात्र असाच एक प्रयत्न "संधिकाली या अशा', पुस्तकाच्या निमित्ताने येथील बारा महिलांनी केला आहे. महिलांनी एकत्र येऊन साकारलेले हे पहिलेच आत्मनिवेदनपर पुस्तक ठरणार आहे.
ज्येष्ठ बालसाहित्यिक रजनी हिरळीकर यांच्या संपादनाखाली पुस्तक आकाराला आले आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या अरविंद दीक्षित यांनी बारा ज्येष्ठ नागरिकांची आत्मनिवेदने असणारे एक पुस्तक "आनंदमार्गावरील आम्ही प्रवासी' या नावाने तयार केले होते. त्या पुस्तकाची प्रस्तावना लिहिताना हिरळीकर यांना महिलांविषयीच्या पुस्तकाची संकल्पना सुचली आणि पुढे काम सुरू झाले. बघता बघता हस्तलिखित तयार झाले. त्यानंतर मात्र कोरोना, लॉकडाउन अशी संकटांची मालिका सुरू झाली. लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर पुस्तकाचं काम पूर्ण झालं. मात्र पुन्हा कोरोनानं डोकं वर काढलं आणि पुस्तकाचा प्रकाशन समारंभ अद्यापही होऊ शकलेला नाही.
रावा प्रकाशनचे राहुल कुलकर्णी यांनी पुस्तक तयार केले आहे.
पुस्तकांत यांच्याविषयी...
श्रीमती रोहिणी पडवळ व वृंदा कुलकर्णी या दोघींनी वयाची 80-90 वर्षे ओलांडलेली आहेत, तर इतर दहाजणी 60 ते 75 वर्षे या वयोगटांतील आहेत. पडवळ यांनी जुन्या काळात आंतरजातीय प्रेमविवाह केला होता.
वृंदाताईंनी पुण्यातील हिंगणे स्त्रीशिक्षण संस्थेत काम केलेले आहे. प्रा. हेमा गंगातीरकर "बीएबीएड' कॉलेजमधून सेवानिवृत्त झाल्या आहेत. कमल कुरळे या प्राथमिक शिक्षिका असल्या तरी श्याम कुरळे या प्रसिद्ध लेखकाच्या पत्नी आणि विविध संस्थांसाठी योगदान देत आल्या आहेत. गिरिजा गोडे या मराठी चित्रपटातून
सहायक भूमिका साकारणाऱ्या तर उषा कुलकर्णी या विशेष मुलांच्या शाळेतील सेवानिवृत्त प्राचार्या आहेत. स्नेहा वाबळे या ख्यातनाम कवी (कै.) प्रा. डॉ. सूर्यकांत खांडेकर यांच्या कन्या, दीप्ती कुलकर्णी या विज्ञान अध्यापिका, तर श्रीमती शैला आठल्ये या समाजातील अंध-अपंग मुलांसाठी धडपडणाऱ्या, श्रीमती वसुधा बावडेकर या पर्यटनाची आवड असणाऱ्या आणि डॉ. संजीवनी तोफखाने या उत्तम लेखिका, वक्त्या, संघटक आहेत.
कोरोनाचे संकट
पुस्तक आता तयार झाले आहे. मात्र, कोरोनामुळे या पुस्तकाचे प्रकाशन न झाल्याने ते अद्याप वाचकांपर्यंत पोचलेले नाही. लवकरच ते वाचकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न आता सुरू झाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.